Site icon Mahaupdatess

phoenix mall fire : फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग

PHOENIX MALL FIRE

PHOENIX MALL FIRE : पुण्यातील विमान नगर येथील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग लागली आहे.

पुण्यातील विमान नगर भागातील फिनिक्स मॉलला शुक्रवारी दुपारी 3.15 च्या सुमारास अचानक आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जावं आणि अग्निशमग दलाचे ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली हे जरी स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किट मुले आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. मॉलमध्ये लागलेल्या आगीचे लोट लांबपर्यंत पसरले आहेत.

पुण्यातील सगळ्यात मोठा मॉल म्हणून ओळख असलेल्या या मॉल मध्ये रोज शेकडो लोकांची वर्दळ असते. आग लागली त्यावेळी अनेक नागरिक आणि मॉल मधील कर्मचारी उपस्थित होते. त्यातील काही नागरिक हे आग लागलेली समजताच बाहेर आले. काही नागरिक आणि कर्मचारी अजूनही मॉल मध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे नेमके किती नुकसान झाले आहे याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकली नाही.

#Ritam Marathi या ट्विटर हॅण्डल वर विडिओ share करण्यात आला आहे.
Exit mobile version