MOBILE RECHARGES TO BECOME EXPENSIVE AFTER LOK SABHA ELECTIONS:
मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. याचा सरळ अर्थ असा की निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज महाग होणार. लोकसभा निवडणुकांनंतर टेलिकॉम उद्योगातील दर 17 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुका ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत ९ टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे.
MOBILE RECHARGES TO BECOME EXPENSIVE AFTER LOK SABHA ELECTIONS:
या अहवालानुसार दूरसंचार उद्योगातील दरवाढ प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून निवडणुकीनंतर ही दरवाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. डिसेंबर २०२१ मध्ये या शुल्कात २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजे सुमारे 3 वर्षांनी दरवाढ होणार आहे.
17% पर्यंत महाग होऊ शकते मोबाईल रिचार्ज
१७ टक्के दरवाढ म्हणजे ३00 रुपयांच्या रिचार्जसाठी भाडेवाढीनंतर 351 रुपये मोजावे लागतील. यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच दणका बसण्याची शक्यता आहे. महागाईचा जोर कायम असताना आता फोनचे रीचार्जही महाग होणार असल्याने देशातील कोट्यवधी लोकांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे.
मोठा आर्थिक फटका! (Big financial hit!)
एका रिपोर्टनुसार, सार्वत्रिक निवडणुकांनंतर दूरसंचार उद्योगांमध्ये 15-17 टक्के शुल्काची वाढ होण्याचा अंदाज आहे.
अँटीक स्टॉक ब्रोकिंगच्या या रिपोर्टनुसार, दूरसंचार क्षेत्रात शुल्क वृद्धी खूप दिवसांपासून पेंडिंग आहे आणि असंही मानलं जातंय की, निवडणुकांनंतर यामध्ये वाढ ही ठरलेली आहे. गेल्या वेळी डिसेंबर 2021 मध्ये याच्या शुल्कात (Mobile Recharge Hike) जवळपास 20 टक्क्यांची वाढ झाली होती. आता जवळपास 3 वर्षांनंतर त्यात वाढ केली जाईल.
कुणाला फायदा होईल?
या रिपोर्टनुसार वोडाफोन आयडियाची बाजार (Mobile Recharge Hike) भागिदारी सप्टेंबर, 2018 च्या 37.2 टक्क्यांनी कमी होऊन डिसेंबर 2023 मध्ये जवळपास अर्धी म्हणजेच 19.3 टक्के राहिली आहे. तर, दुसरीकडे भारतीची बाजार भागिदारी या दरम्यान 29.4 टक्क्यांनी वाढून 33 टक्के झाली आहे. जियोची बाजार हिस्सेदारी या दरम्यान 21.6 टक्क्यांनी वाढून 39.7 टक्के झाली आहे. त्यामुळे जियोला याचा लाभ होईल.