मुसळधार पावसाने दुबईला पूर, मुंबई सोबत तुलना !
दुबई हे संपूर्णपणे वाळूने बनलेले शहर आहे! हजारो किलोमीटरचे वाळवंट… जिथे अधूनमधून जोरदार वादळामुळे दुबईला पूर येतो. या बातमीवर अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र, दोन वर्षांतील सर्वाधिक पाऊस एकाच दिवसात पडल्यानंतर शहराचा बराचसा भाग आणि रस्ते पाण्याखाली गेले. 16 एप्रिल रोजी, ‘वाळवंट शहर’ ने पहिला लक्षणीय पाऊस अनुभवला. त्यानंतरही पाऊस सुरूच होता. गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरूच होता. दुबईवासियांना अशा वातावरणाची बिलकूल सवय नाही. मुसळधार पावसामुळे काही तासांतच दुबई डुबई झाली .
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक मेट्रो स्थानके, मॉल्स, रस्ते, व्यावसायिक इमारती जलमय झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, दुबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘ही मुंबई नसून दुबई आहे’ अशा शब्दांत अनेकजण या पुराचे वर्णन करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या 24 तासात 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या भागात दोन वर्षांत एवढा पाऊस पडतो. एकाच दिवसात दोन वर्षांच्या पावसाने दुबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Nope.
— anand mahindra (@anandmahindra) April 16, 2024
Not Mumbai.
Dubai…
https://t.co/vvKx4WkKbm